

दापोली एज्युकेशन सोसायटी
1880 साली लंडन स्थित ‘सोसायटी फॉर प्रपोगेशन ऑफ गॉस्पेल’ अर्थात एस.पी.जी. मिशन या ख्रिस्ती संस्थेने आपल्या धर्मप्रसार कार्याचा एक भाग म्हणून दापोली मध्ये इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू केली.
कालांतराने धर्मप्रसाराचा हेतू साध्य होत नसल्यामुळे मिशनने हे हायस्कूल बंद करण्याचे ठरविले. तोपर्यंत दापोलीतील दोन पिढ्या या शाळेत शिकून गेल्या होत्या. या विद्यार्थ्यांनी SPGमिशन कडून ही शाळा विकत घेण्याचे ठरविले व त्यासाठी 6 जुलै 1928 रोजी ‘दापोली एज्युकेशन सोसायटीची’ स्थापना झाली. त्यावेळी ₹18000/- देऊन दापोली एज्युकेशन सोसायटीने ही शाळा व गॅडने राहत असलेला परिसर मिशन कडून विकत घेतला.
शाळेचे माजी विद्यार्थी व त्या काळातील नावाजलेले वकील पां.वा काणे (जे नंतर मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू झाले व ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित केले गेले.) यांनी दापोली एज्युकेशन सोसायटीच्या स्थापनेमध्ये पुढाकार घेतला. त्या काळात लोकांकडून वर्गणी जमा करून ही रक्कम संस्थेने उभी केली. नव्याने स्थापन झालेल्या दापोली एज्युकेशन सोसायटीच्या बहुतांश संचालकांचे अल्फ्रेड गॅडने हे शिक्षक असल्यामुळे त्यांचेच नाव शाळेला दिले गेले. त्यामुळे आतापर्यंत ‘मिशन हायस्कूल’ अशा नावाने चाललेली शाळा ‘अल्फ्रेड गॅडने हायस्कूल'(ए. जी. हायस्कूल) या नावाने ओळखली जाऊ लागली.
Mission
Mission Statement
To impart holistic and value-based education that fosters self-reliance, nurtures a spirit of diligence and responsibility, and develops socially conscious citizens committed to contributing effectively to the progress and glory of the nation.
समग्र व संस्काराधिष्ठित शिक्षण प्रदान करून आत्मनिर्भरता, कर्मशीलता व जबाबदारीची जाणीव विकसित करणे, तसेच समाजाभिमुख व राष्ट्राच्या प्रगती व वैभवासाठी अर्थपूर्ण योगदान देणारे नागरिक घडविणे.
Latest Updates
- All Posts
- Activities








